Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात तीन तलवारी हस्तगत; तरूणाला अटक

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरातून पोलीसांनी तीन धारदार तलवारी जप्त करण्यात आली असून एका तरूणाला अटक केली आहे. या कारवाईने भुसावळ खळबळ उडाली आहे.

गुलाम गौस कालू शहा (23, मुस्लिम कॉलनी, बाहेर मस्जिदसमोर, भुसावळ) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात संशयित गुलाम शहर हा धारदार शस्त्र बाळगत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजार पेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.  बुधवारी ३० मार्च रोजी सकाळी कारवाईच्या सुचना दिल्यानंतर  बाजारपेठ पोलिस ठाण्यातील सपोनि शरीफोद्दीन काझी, पो.कॉ. जावेद हकीम शहा, सचिन पोळ, अक्षय चव्हाण व योगेश माळी आदींच्या पथकाने तरुणाच्या घरी छापा टाकला. या कारवाईत तरूणाच्या घरात तीन धारदार तलवारी जप्त करण्यात आले. याप्रकरणी संशयीत आरोपी तरुणाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.  पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकारी करीत आहेत.

 

 

 

 

Exit mobile version