Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्त्यात जबरी लूट करणारे तिघे जेरबंद

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । चाकूचा धाक दाखवून एका तरुणाला तिघांनी जबरी लुटल्याची घटना वाघळी, हिंगोणे रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी पोलिसात नोंद होताच ग्रामीण पोलिसांनी तपासाचा चक्र फिरवत अवघ्या सहा तासात संशयितांना अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील विशाल संजय लिंगायत (वय-२२) हा तरुण वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. एका दुकानावर पाववड्याची विक्री करून तो कुंटुंबाची गुजराण करतो. दरम्यान शनिवार, २५ जून रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास तो आपल्या बुलेटने (एम.एच. १९ एक्यू ६४६४) जामनेरकडे जात होता. तेव्हा वाघळी-हिंगोणे शिवारातील चक्रधर मंदिराजवळ मागून आलेल्यांनी त्याची दुचाकी अडवली. व लिंगायतला बाजूच्या शेतात ओढत घेऊन गेले. तिघांनी चाकूचा धाक दाखवून खिश्यातील २७ हजार रुपये रोख व ११ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले.

याप्रकरणी लिंगायतच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार सपोनि रमेश चव्हाण हे करीत होते. त्यांच्यासह पथकांनी संशियित आरोपींचा शोध घेऊन अवघ्या सहा तासात ताब्यात घेतले. राजेंद्र पाटील (वय-३०), जयेश उर्फ सानी सोमनाथ चव्हाण (वय-१९), ओंकार उर्फ सत्यम राजेंद्र महाजन सर्व रा. पातोंडा ता. चाळीसगाव असे अटक केलेल्या संशियित आरोपींची नावे आहे. पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण हे करीत आहे.

Exit mobile version