Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तीन जण गंभीर जखमी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यातील दोन जणांनी प्रकृती गंभीर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरापासून ३ किलोमिटर लांब यावल-भुसावळ मार्गावरील रस्त्यावर सब्हानी पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ , ४० वाजेच्या सुमारास भुसावळकडून येणाऱ्या व यावलकडून भुसावळकडे जाणाऱ्या दोन दुचाकींची समोर समोर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात संतोष पुंडलीक धनगर (वय-२८) रा. निमगाव, शेख शोएब शेख मेहमुद (वय-२४) रा. किनगाव तालुका यावल आणि फारूख शेख उरमान (वय-३०) रा. भुसावळ हे तिन जण जख्मी झाले. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी भुसावळ येथे खाजगी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे .

Exit mobile version