Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मॅक्सिमो व कंटेनरचा भीषण अपघातात 3 जण जखमी

मॅक्सिमो व कंटेनरचा भीषण अपघातात 3 जण जखमी

यावल प्रतिनिधी । फैजपुर यावल राज्य मार्गावर दि. 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास मॅक्झीमो व कंटेनर यांच्यात  भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावलपासुन 3 किलोमिटर लांब असलेल्या चितोडा गावाजवळील बुरहाणपुर अंकलेश्र्वर राज्य मार्गावर दि. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील डोंगर कठोरा येथील राहणारे चंद्रकांत रामदास सोनवणे (वय-२५) हे
आपल्या पत्नीसह पल्लवी चंद्रकांत सोनवणे नातेवाईकाच्या अत्यंयात्रेत सहभागी होण्यासाठी आले असता, यावलहुन अत्यंविधीचा कार्यक्रम आटोपुन आपल्या गावाला (मॅक्झीमा एम.एच.१९, ३१९८) या चारचाकी वाहनाने गावाकडे जाण्यास निघाले होते. मात्र, चितोडा गावाजवळ असलेल्या पुलावर बुऱ्हाणपुर कडुन यावल कडे येणाऱ्या कंटेनर (क्रमांक एम.पी.१२, ४७०) या अरबी भरवुन जाणाऱ्या गाडीचा अचानक टायर फुटल्याने गाडीचा तोल गेल्याने हा अपघातात झाला आहे. मात्र कंटेनर चालकासह क्लीनरने घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. या अपघात दोघं दाम्पत्यासह मुरलीधर ओंकार तायडे (वय-५५) रा. मालोद हे देखील जखमी झाले आहे. यांना तात्काळ चितोडा गावातील नागरिकांनी मदत करत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली असून पंचनामा करण्यात आला आहे.

Exit mobile version