Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीचा कट लागल्यावरून तिघांना मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने येत समोरून येणाऱ्या दुचाकीला कट मारणाऱ्याला जाब विचारल्याने तीन जणांना जातीवाचक शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ परिसरातील विक्रम राजू सारवान (वय-३२) व विक्रम प्रताप बेंडवाल हे गुरुनानक नगरमधून दुचाकीने जात असताना काट्याफाईल रिक्षा थांब्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने कट मारला. तसेच दोघांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केली. शिवीगाळ का करत आहे, असे विचारले असताना दोन जणांनी सारवान व बेंडवाल यांना मारहाण केली. त्या वेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आकाश राजू मिलांद यांच्याही डोळ्यावर बुक्का मारून दुखापत केली. याप्रकरणी विक्रम सारवान यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले करीत आहेत.

Exit mobile version