Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घराच्या हिस्से वाटणीवरून तीन जणांना बेदम मारहाण; शहर पोलीसात सहा जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । वडीलाेपार्जित घराच्या हिस्सेच्या वादातून एकाला दोन मुलांसह त्यांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिवाजी नगर हुडको भागात घडली. याप्रकरणी शहर पोलीसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, समशोद्दीन जयोनोद्दिन शेख (वय-६२) रा. शनिपेठ काट्या फाईल हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते फळ विक्री करून उदरनिर्वाह करतात. समशोद्दिन शेख व त्यांची दोन्ही मुले तनवीन समशोद्दिन आणि तौसिफ समशोद्दिन हे दुचाकीने शिवाजी नगर हुडको भागातून घरी जात असतांना त्यांचा भाऊ मोयोनोद्दिन जयोनाद्दिन शेख, फरहाण मोयोनोद्दिन  शेख, अकबर सिराजोद्दिन शेख, जिराजोद्दिन जैनाद्दिन, इरुान मोयोनोद्दिन शेख आणि शरीफ शेरू यांच्या अन्य दोन अनोळखी जणांनी रस्ता अडवून वडीलोपार्जीत घराच्या हिस्सेच्या वाटणीवरून समशोद्दिन व त्यांच्या दोन्ही मुलांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तर फरहाण मोयोनोद्दिन  शेख याने तनवीर शेखच्या डोक्यात दगड हाणला यात तो जखमी झाला. तिघांना सहा जणांकडून जीवेठार मारण्याची धमकी दिली. समशोद्दिन यांनी मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. समशोद्दिन यांच्या तक्रारीवरून सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय झाल्टे करीत आहे. 

Exit mobile version