Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीच्या धडकेत पायी जाणारे तिघे जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी निवासस्थानसमोरील रस्त्यावर अज्ञात दुचाकीधारकाने जोरदार धडक दिल्याने पायी जणाऱ्या बहिण भावांसह त्यांच्या आजी जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील व्यंकटेश कॉलनीत प्रेरणा हरीचंद्र पाटील वय-१८ या तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तरूणी प्रेरणा पाटील या त्यांचा भाऊ वैष्णव वारके आणि आजी संजीवनी वारके यांच्यासोबत जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ असलेल्या ऑफीसर क्लब समोरून पायी जात होते. त्यावेळी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीआर ५६४६) वरील अज्ञात चालकाने तिघांना जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वार हा दुचाकी घेवून पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.

Exit mobile version