Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी महापौरांसह तीन नगर सेवक अटकेत

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह तीन नगरसेवकांना खार पोलीसांनी अटक केली आहे.

किरीट सौमय्या यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात माजी महापौर, तीन नगरसेवक यांच्यासह काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याप्रकरणी विश्वनाथ महाडेश्वर, हाजी खान, चंद्रशेखर वैगणकर
दिनेश कुबल चार जणांना अटक केली आहे.

किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी दि. २३ एप्रिल रोजी खार पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. पोलीस स्टेशनमधून परत जात असताना किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. त्यावेळी यामध्ये किरीट सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली होती तर सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले होते. त्यावेळी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर देखील उपस्थित होते.

किरीट सोमय्यांवर जीवे मारण्याच्या हेतूने हा हल्ला झाल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे तर सोमय्यांच्या वाहनचालकाने शिवसैनिकांवर गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाडेश्वर यांनी केली. या संदर्भात सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी महाडेश्वर पोलीस स्थानकात गेले होते.

Exit mobile version