Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर येथे दुचाकीच्या डिक्कीमधून तीन लाखाची रोकड लांबविली

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगरातील माजी पोलीस पाटील यांच्या दुचाकीच्या डिक्कीमधून ३ लाख रुपये अज्ञान चोरट्यानी लंपास केले असून याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी सुरेश रघुनाथ बोठे (वय ६४, राहणार वढवे, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) यांनी आज दि. ०८ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आपल्या शालकचे कर्ज भरण्यासाठी मुक्ताईनगर येथील ICICI बँकेतून तीन लाख रुपये रोख रक्कम काढली व त्यांनी ती रक्कम त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली व ते श्री गणेश इलेक्ट्रिकल बोदवड रोड मुक्ताईनगर येथे काही वस्तू घेण्यासाठी थांबले असताना त्यांच्या टीव्हीएस स्टार सिटी क्रमांक (MH19 CL 5642) या गाडीच्या डिक्की मधून अज्ञात चोरट्याने तीन लाख रुपये लांबविले. ते सामान घेऊन परत आले असता त्यांच्या दुचाकी मधून तीन लाख रुपये रक्कम चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. असता त्यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन सर्व प्रकार सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पो. हे. कॉ. श्रवण जवरे हे करीत आहेत.

 

Exit mobile version