Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा मृत्यू

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । धुळे तालुक्यातीलबोरी शिवारात नरभक्षक बिबट्याने बालकावर हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना २६ रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. रूग्णालयात त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या नरभक्षक बिबट्याने हल्ल्यात तीन बालकांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील बोरी परिसरात असलेल्या मोघण येथील धाडरे रस्त्यावरील शेतातील घरात रमेश नरसिंह दुडवे (पावरा) हा ९ वर्षाचा मुलगा आपल्या कुटूंबासोबत झोपलेला असतांना बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याला शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने आरडाओरड केल्याने जवळ झोपलेल्या कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने दक्ष नागरिकांनी धाव घेत आरडाओरड करत बिबट्याला पळवले. यात जखमी झालेल्या बालकाला धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या मानेवर बिबट्याने पंजा मारल्याने रमेशची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान रमेश दुडवे या बालकाचा देखील मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला होत. यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तातडीने बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

Exit mobile version