Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातून एम.आय.एम.सह तिघांचे उमेदवारी अर्ज अवैध

jc8kolng evm and vvpat 625x300 20 March 19

जळगाव, प्रतिनिधी |येथील विधानसभा मतदार संघातून २४ उमेदवारांनी दाखल केलेल्या ३८ अर्जांपैकी ०३ अर्ज आज (दि.५) छाननीनंतर अवैध ठरले असून त्यामध्ये दोन अपक्ष आणि एक एम.आय.एम.च्या उमेदवाराचा समावेश आहे.

 

विष्णू गणपत घोडेस्वार यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी ए.बी. फॉर्म जोडलेला नाही, म्हणून अवैध ठरविण्यात आला आहे. तर एमआयएमचे रेयान अब्‍दुल नबी जहांगीर आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले कालू तेजू कोळी यांनी अपूर्ण प्रस्तावक दिल्याने दोघांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. तसेच स.पा.तर्फे ए.बी. फॉर्म सादर न करू शकल्याने डॉ. राधेश्याम चौधरी यांना सायंकाळपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली असून सध्या त्यांचा तो अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. त्याचवेळी त्यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज वैध ठरल्याने ते निवडणूक मैदानात कायम आहेत.

Exit mobile version