Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोराडखेडा येथे किरकोळ कारणावरून तिघांना बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील गोराडखेडा येथे किरकोळ कारणावरून एकाला मुलीसह नातवाला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील गोराडखेडा येथील मधुकर सावळे हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. काल सोमवारी १६ रोजी रात्री मधुकर सावळे, त्यांची मुलगी वर्षा व नात खुशी हे घरात असतांना गावातील नामदेव पुंजु सावळे, दिपक नामदेव सावळे, सुनिल नामदेव सावळे व दिपाली नामदेव सावळे यांनी घरात घुसून ‘तुम्ही माझी पत्नी हिचे बाबत गावात बदनामी का करता’  असे बोलुन मधुकर सावळे, वर्षा व खुशी यांना लाकडी दांड्याने व चापटा बुक्क्यांनी मारहाण करत जीवेठार मारण्याची दिल्याने मधुकर सावळे त्यांच्या पत्नी प्रमिला मधुकर सावळे त्यांच्या फिर्यादीवरून नामदेव पुंजु सावळे, दिपक नामदेव सावळे, सुनिल नामदेव सावळे व दिपाली नामदेव सावळे सर्व रा. गोराडखेडा ता. पाचोरा यांचे विरुध्द १७ रोजी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन निकम हे करीत आहेत.

 

 

Exit mobile version