Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह तिघांना अटक

चोपडा प्रतिनिधी । एलसीबीचे पथक व शहर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गावठी कट्टे व जीवंत काडतुसांसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

उमर्टी वरला येथून गावठी कट्टे व जीवंत काडतुसे खरेदी करुन काही तरुण चोपडा शहरातून जाणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले तसेच पो.नि. अवतारसिंग चव्हाण यांना समजली होती. यानुसार एलसीबी व चोपडा शहर पोलिसांनी चोपडा ते चुंचाळे रोडवर स्माशनभुमीजवळ मयुर काशिनाथ वाकडे (२२, अरुणनगर, चोपडा) याच्या ताब्यातून २५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल तसेच दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. यासोबत आरोपीकडील दुचाकी (एम.एच.१९ डी.एच.४०५४) जप्त करण्यात आली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार राजेंद्र काशिनाथ पाटील, पो.हे.कॉ. सुधाकर रामदास अंभोरे, पो.हे.कॉ. अश्रफ निजामोद्दीन शेख, चोपडा शहर पोलिस स्टेशनचे सहायाक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार जगदेव, सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्‍वर तुरनर यांच्यासह इतरांनी केली.

 

Exit mobile version