Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वेतून लाखो रूपयांचे दागिने व रोकड लांबविणाऱ्या तिघांना अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते मुंबई दरम्यान कुरियरचे डिलिव्हरीचे काम करणाऱ्या ६४ वर्षीयवृद्ध व्यक्तीचे रेल्वेतून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २२ लाख ४३ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या ३ जणांना जळगाव शहरातील आयोध्यानगर आतून अटक केली आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी भुसावळ रेल्वे पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भावना जवारलाल लोढा, तनिष्का भावना लोढा, आणि अनिल रमेश चौधरी तिघे राहणार आयोध्या नगर, जळगाव अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “हरिश्‍चंद्र खंडू वरखडे (वय-६४) रा. शिवाजी नगर, जळगाव हे वृद्ध व्यक्ती आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. जळगाव ते मुंबई दरम्यान कुरिअर डिलिव्हरीचे काम करतात. सोनारांनी दिलेले दागिने हे मुंबईत दिलेल्या पत्त्यावर पोहोचण्याचे काम ते करत असतात. त्याचा मोबदला त्यांना दिला जातो.

अशाच पद्धतीने हरिश्चंद्र वरखेडे हे सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजता जळगाव येथून हावडा-मुंबई मेलमध्ये त्यांच्या बुकींच्या जागेवर बसले होते. रेल्वे ही पाचोरा शहराकडून मुंबईकडे रवाना होत असताना खिडकीसमोर बसलेल्या तरूणाने त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने आणि रोकडची कापडी पिशवी लांबविली. त्यांनी आरडाओरड केली. परंतू तोपर्यंत काहीही उपयोग झाला नाही. त्यांनी अखेर त्यांनी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे जळगाव शहरातील अयोध्या नगरात असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे पोलिसांनी मिळाली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी आज बुधवार, दि. १० ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने भावना जवारलाल लोढा, तनिष्का भावना लोढा, आणि अनिल रमेश चौधरी तिघे राहणार आयोध्या नगर, जळगाव या तीन जणांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी तिघांना भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version