Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऑटो रिक्षा चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातीलल गवळीवाडा येथून एकाची ३० हजार रूपये किंमतीची रिक्षा चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, आकाश भास्कर वाघ (वय-२२) रा.गौतम नगर, तांबापूरा हे रिक्षा चालक असून आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी १२ एप्रिल रोजी त्यांनी रात्री १० वाजता त्यांची मालकीची (एमएच १९ व्ही ६६२२) क्रमांकाची रिक्षा त्यांच्या घरासमोर पार्क करून लावली होती.  बुधवारी १३ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास रिजवान शेख गयासोद्दिन शेख, रवि प्रकाश चव्हाण, आवेश जावीद शहर सर्व रा. बिस्मला चौक, तांबापूरा जळगाव यांनी घरासमोरील रिक्षा चोरून घेवून जात असतांना आढळून आले. दरम्यान, आकाशच्या लक्षात आल्याने तिघांनी रिक्षा सोडून पसार झाले होते. दरम्यान, आकाश वाघ याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून १३ एप्रिल रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रिजवान शेख गयासोद्दिन शेख, रवि प्रकाश चव्हाण, आवेश जावीद शहर सर्व रा. बिस्मला चौक, तांबापूरा जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.

Exit mobile version