Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कॉ. पानसरे हत्याप्रकरणी तिघांना पुणे, मुंबई कारागृहातून पहाटे अटक

 

govind pansare 759

 

कोल्हापूर (वृत्तसंस्था) ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील आणखी तीन मारेकऱ्यांना आज पहाटे मुंबई, पुणे एथिक कारागृहातून अटक करण्यात आली आहे. या अटकसत्रामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन अंदुरे या शार्प शूटरचा समावेश आहे. अंदुरे याला पुणे येथील जेलमधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी अकरा वाजता तिन्ही मारेकऱ्यांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे कळते. अंदुरे, बद्दी व मिस्कीन यांना ताब्यात घेतल्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपीची संख्या बारा झाली आहे.

Exit mobile version