Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवडात तलवार हातात घेवून दहशत माजवणाऱ्या तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । बोदवड शहरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तीन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

अक्षय भास्कर दांदडे (वय १९, रा. जामठी रोड, बोदवड), आनंद उर्फ नाना गोपाळ बडगुजर (वय २३, रा. बडगुजर वाडा, बोदवड) व विक्की अशोक साबे (वय २१, रा. जामठी दरवाजा, बोदवड) असे अटक केलेल्या तीघांची नावे आहेत. हे तीघे हातात तलवार घेऊन बोदवड शहरात दहशत पसरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक महाजन, शरीफ तडवी, युनूस शेख, विनोद पाटील, रणजित जाधव यांच्या पथकाने तीघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चौकशीसाठी ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

 

 

Exit mobile version