Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसताना तरुणासह परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सार्वे गावात काहीही कारण नसताना एका तरुणासह त्याच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, समाधान अशोक अहिरे वय-२६, रा. सार्वे ता. धरणगाव या तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान काहीही कारण नसताना शनिवार ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता गावात राहणारे सुनील शंकर मरसाळे, ज्ञानेश्वर शंकर मरसाळे, शुभम ज्ञानेश्वर मरसाळे आणि संदीप सुनील मरसाळे यांनी समाधान अहिरे याला शिवीगाळ करत त्याची आई वडील आणि पत्नी यांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान त्यांच्या घरात असून घरातील संसार उपयोग वस्तूची तोडफोड करून नुकसान केले आहे. याप्रकरणी अखेर समाधान अशोक अहिरे यांनी सोमवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलिसात धाव घेऊन धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मारहाण आणि नुकसान करणारे चार जणांविरोधात धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस नाई दीपक पाटील हे करीत आहे.

Exit mobile version