Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बापरे : भुसावळात पीएसआयलाच जिवे ठार मारण्याची धमकी

भुसावळ प्रतिनिधी | गस्तीवर असणार्‍या पोलीस उपनिरिक्षकालाच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला असून या प्रकरणी टोळक्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, बाजारपेठ पोलीस स्थानकात कार्यरत असणारे पोलीस उपनिरिक्षक महेश भास्कर घायतड हे चालक दिनेश कापडणे यांच्यासह शहरातील श्रीरामनगर भागात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत होतो. तेथील हनुमान मंदिराजवळ तेथे विना क्रमांकाच्या दुचाकीसह एक झायलो कार दिसून आल्याने त्यांनी संबंधीतांना याबाबत विचारणा केली. यावेळी सात-आठ जणांच्या टोळक्याने त्यांना धक्काबुक्की करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. आम्ही आधी एक खून केला असून आम्हाला बॅकींग असल्याने कुणी आमचे काहीही बिघडवू शकत नसल्याचे सांगत त्यांनी घायतड यांना धमकावले.

या अनुषंगाने उपनिरीक्षक घायतड यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार निखिल राजपूत, अक्षय न्हावकर उर्फ थापा, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, नीलेश ठाकूर व अन्य एका अनोळखी अशा एकूण ८ जणांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणने व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये करत आहेत.

दरम्यान, या टोळक्याचा म्होरक्या निखील राजपूत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांनी दिली आहे. आता थेट पीएसआयलाच धमकी दिल्यामुळे शहरात खळबळ उडाली असून या टोळक्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Exit mobile version