Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र पोलीसात हजारो पदांची “महाभरती”

police bandobast

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलिस विभाग ‘पोलिस सैनिक चालक व सशस्त्र पोलिस सैनिक’ साठी पदे भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ डिसेंबरपर्यंत आहे.

पोलीस शिपाई चालकासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार बारावी उत्तीर्ण व हलके वाहन[LMV -TR] चालविण्याचा वैध परवाना असावा. नक्षलग्रस्थ भागाताली उमेदवारांना ही अट सातवी उत्तीर्ण अशी आहे. सशस्त्र पोलीस शिपाई [SRPF] या पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवार बारावी उत्तीर्ण असल्यास पात्र ठरेल.

शारिरीक पात्रता :-
उंची :- पुरुष :- १६५cms / महिला :- १५८cms
छाती :- पुरुष :- ७९ cm न फुगवता
नक्षलग्रस्थ उमेदवारांना छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही

वयोमर्यादा :-
दि. ३१/१२/२०१९ रोजी
पोलीस शिपाई चालक :- १९ ते २८ वर्षे
सशस्त्र पोलीस शिपाई :- १८ ते २५ वर्षे

परीक्षा फी :-
खुला प्रवर्ग :- Rs. ४५०/-
मागासवर्गीय प्रवर्ग / अनाथ मुले :- Rs. ३५०/-

Exit mobile version