Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील मनुर येथील मुलाचे लग्न लावण्यासाठी गावातील नातेवाईक व मित्र मित्रमंडळी भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे आले असता वरणगावला जात असताना सुसरी गावाजवळ दुचाकीला एसटीने धडक दिल्याने तीघे युवक जागीच झाल्याची दुदैवी घटना सोमवारी दुपारी घडली. मयत झालेल्या तिघा युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे मुरलीधर शेळके यांच्या मुलाचे वासुदेव चौके यांच्या मुलीशी लग्न लावण्यासाठी मनुर गावातील नातेवाईक व मित्र पिंपळगावला आले होते. त्या ठिकाणी लग्न लागण्याला वेळ असल्याने बोदवड तालुक्यातील मनूर येथील भागवत प्रल्हाद शेळके याच्या ताब्यातील टीव्हीएस कंपनीची स्टार सिटी मोटरसायकल क्रमांक (एमएच १९ सीएस ११९८) हा चालवत असतांना व त्याच्या मागे बसलेले सचिन राजेंद शेळके (वय २६), जितेंद्र केलास चावरे (वय ३२) सर्व रा मनुर हे तिघे वरणगावला काही कारणा निमित्त जात असताना होते. दुपारी १.२० च्या सुमारास पिंपळगाव सुसरी गावाच्या रस्त्याच्या मध्ये अशोक हरी पाटील यांच्या शेताजवळ बस क्र. (एमएच २० बीएल ०९४८) हिचेवरील चालक नामे दिलीप आप्पा तायडे यांच्या ताब्यातील एस. टी. बस भरधाव वेगात चालवुन नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या भागवत शेळके यांच्या ताब्यातील दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात भागवत शेळके, सचिन शेळके आणि जितेंद्र चावरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली. वरणगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेनंतर पिंपळगाव येथे लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी मृत तरूणांच्या नातेवाईकांची भेट घेवून सांत्वन केले.

Exit mobile version