भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यानी नैतिकतेची भाषा करू नये – राणा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्य कसे चालवावे हे देवेंद्र फडणवीस यांच्या कडून शिकावे, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यानी तर नैतिकतेची भाषा करू नये, अशी टीका खा. नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली आहे.

राज्यात ओबीसी आरक्षण, शेतकरी आत्महत्या, तसेच अनेक गंभीर प्रश्न असताना राज्य सरकार काही करत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार चांगले काम करीत आहेत, उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेले वक्त्यव्य ऐकले, एका महिलेवर पोलीस ठाण्यात अन्याय होत असेल तर त्याची सर्व माहिती समोर आणावी. सांताक्रुज पोलीस ठाण्यातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासावेत मग बोला.

मुख्यमंत्र्यांची दडपशाही आणि आमच्यावर झालेल्या अन्यायकारक वागणुकीची तक्रार दिल्लीत करणार असून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचेही राणा दाम्पत्याने प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.

यावर कोर्टाने राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. कायदा सुव्यवस्थेला वेठीस धरू नये, पुराव्याशी कोणतीहि छेडछाड करू नये. पोलिसांना तपास कामी सहकार्य करावे. माध्यमांशी प्रतिक्रिया मुलाखती देऊ नये अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हनुमान चालीसा वरून वक्तव्ये केली आहेत , त्यामुळे त्यांचा जामीन रद्द होण्याची शक्यता असून याविरोधात आज सोमवारी न्यायालयात जाणार असल्याचेही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावेळी म्हटले आहे.

Protected Content