Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘ज्यांना मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ वाटत नाहीत; ते भारतीय नव्हेत’

jitendra singh 1486926350

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘फादर ऑफ इंडिया’ ही उपाधी ज्यांना अभिमानास्पद वाटत नसेल त्यांनी स्वत:ला भारतीय म्हणवून घेऊ नये, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले. ते बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या टपाल खात्याच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

भूतकाळात जगभरामध्ये भारताला क्वचितच जो सन्मान मिळत होता, तो सन्मान आता मिळतो आहे. भारताबाहेर राहणाऱ्या प्रत्येकाला आज भारतीय असल्याचा विशेष अभिमान वाटतो आहे. पंतप्रधान मोदी यांचे कार्य आणि कर्तृत्व यांच्यामुळेच आज हे घडते आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणणे अगदी योग्य आणि समर्पक असेच आहे. अमेरिकेच्या यापूर्वीच्या कोणत्याही अध्यक्षाने भारताच्या पंतप्रधानांबद्दल अशा पद्धतीने उल्लेख केल्याचे दाखले किंवा पुरावे सापडत नाहीत,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांचा जो गौरव केला आहे, त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. राजकीय मतभिन्नता आणि वैचारिक विश्व बाजूला ठेवून या वक्तव्याचे स्वागत केले पाहिजे,’ असा सल्ला सिंह यांनी दिला.

Exit mobile version