Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ जळीत विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू ; पतीला अटक

1

1

जळगाव प्रतिनिधी । पाचोरा येथील माहेर आणि जळगाव येथील सासर आलेल्या विवाहितेला माहेरहून पैसे आणले नाही म्हणून रागाच्या भरात अंगावर डिजेल ओतून पेटवून दिल्याची घटना 30 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. या विवाहितेचा आज उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. दरम्यान,या प्रकरणी मयत विवाहितेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिनाक्षी मनिष बेंडवाल (वय-29) रा. शिवशक्ती नगर, शिवाजी नगर परीसर, यांचे पती मनिष अशोक बेंडवाल हे रिक्षा चालक असून त्यांना तीन मुली आहे. माहेरहून पैसे आणावे यासाठी मनिष यांनी पत्नीला माहेरी पाचोरा येथे 30 जून रोजी सकाळी पाठविले होते. त्याच दिवशी मनिष बेंडवाल हा पत्नी मिनाक्षी हिला घेण्यासाठी रिक्षाने पाचोरा येथे गेला. पाचोराहून रिक्षाने जळगावकडे रात्री 8 वाजता निघाले. दरम्यान रस्त्यावर त्यांनी पैश्यांकरीत एकटे साधत पैसे का आणले नाही? असे विचारत मिनाक्षीला मारहाण केली. रात्री 11 वाजता ते शिवशक्ती नगरत पोहचले. घरी आल्यावर पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. यात संतापाच्या भरात डिझेलची कॅन मिनाक्षीच्या आंगावर ओतून पेठवून दिले होते.

 

यावेळी अराडाओरड सुरू झाल्यानंतर पती मनिषनेच तिला शहरातील खासगी रूग्णालयात उपचाराथ दाखल केले. मीनाक्षी 82 टक्के भाजल्या गेल्या होत्या. शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत. महिलेचा जबाब नोंदवून घेतला. यात पतीने पैश्यांकरीत पेटवून दिले तर याला कारण सासु रामकली अशोक बेंडवाल हिचा देखील सहभाग असल्याचे सांगितले आहे. जळीत महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात पती आणि सासु विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मनीषला पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपी सासूचा शोध सुरु आहे.

Exit mobile version