Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

असा असेल मराठा आंदोलनाचा मुंबई मोर्चाचा मार्ग

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई येण्याचा मार्ग जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. या आंदोलनादरम्यान अंतरवली ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार आहे, या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबईत किती लोक येणार? हे ही त्यांनी सांगितले. मुंबईत आंदोलनास येण्यासाठी मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून निघणार आहे. सर्व मराठा शंभर टक्के मुंबई जाणार आहे. त्यांनी आपल्या खाण्या पिण्याच्या वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
असा असणार मार्ग
20 जानेवारी पहिला मुक्काम- बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)
21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव (पुणे जिल्हा)
23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
24 जानेवारी पाचवा मुक्काम- (लोणावळा)
25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
26 जानेवारी 7 मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी
पुण्यात एक कोटी मराठा येणार
पुण्यामध्ये मराठा समाज बांधवाचा अकाडा एक करोडो होणार आहे. आम्ही पुण्यात दोन दिवस थांबणार आहे. आम्हाला पुणे बघायचे आहे. पुण्यावरुन सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाणार आहे. मुंबई जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत. त्यांनी झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे. मुंबई जाताना कुणीही व्यसन करायचे नाही. तसेच प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल त्यांनी ते घेऊन यावे, असे आवाहन केले. आंदोलनाला कोणी गालबोट लावत असेल तर त्याला पोलिसांचा ताब्यात देण्याची त्यांनी सांगितले.

Exit mobile version