हा टोमणे सेनेचा नाही, महाराष्ट्राचा अपमान आहे – गजाजन काळे

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असे मंत्री धनंजय मुंढे यांनी सांगली येथील कार्यक्रमात वक्तव्य केले होते, यावर राउत आणि सेना काय तुमची धुणी भांडी करायची का? हा टोमणे सेनेचा नव्हे तर महाराष्ट्राचा अपमान आहे आणि तो सहन केला जाणार नसल्याचे मनसेचे नेते गजाजन काळे यांनी ट्वीट करीत टीका केली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी खा.सुप्रिया सुळे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे, सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन नवस फेडीन, असे म्हणत देवीला साकडे घातले होते, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच वर्ष माझ्यावर विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली होती, आणि ती उत्तम पद्धतीने हाताळली देखील. सत्ताधारी पक्ष कितीही मजबूत असू द्या मी त्याला गदागदा हलवू शकतो, त्यामुळे पुढच्या काळात जे कोणी मुख्यमंत्री असतील ते आपलेच असतील असे मंत्री धनंजय मुंढे यांनी सातारा येथील कायर्क्रमात म्हटले आहे.
धनंजय मुंढे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यावर राऊत आणि सेनेने काय तुमची धुणी भांडी करायची का? अशी खोचक टीका मनसेचे गजानन काळे यांनी ट्वीटवर केली. यावर शिवसेनेचे खा. संजय राउत यांनी कोणी काहीही बोलणार, त्यावर मी बोलणार नाही असे म्हणत पत्रकारांना कोणतीही प्रतिकिया दिली नाही. मात्र प्रत्येक पक्षाला त्याचा पक्ष विस्तार आणि प्रगल्भ करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे राष्ट्रवादीचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे.

Protected Content