Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा शहरातून तेरा वर्षीय मुलाचे अपहरण

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील फुले नगर भागातून १३ वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील फुले नगर भागात रुपेश उर्फ भुऱ्या अमृत माळी (वय-१३) हा अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबीयांच्या वास्तव्याला आहे. १६ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रुपेश याला अज्ञात व्यक्तीने पुरुष लावून पळून नेल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत मुलाची आई कल्पना अमृत माळी यांनी तातडीने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.

 

 

 

Exit mobile version