तेरा शेतकऱ्यांची फसवणूक करणारे तीन भामटे जेरबंद

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोसंबीचा माल परस्पर विकून पैसे न देता फरार होणारे तीन जणांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डीबीच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, “चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी माधव छगन जाधव त्यांनी शेतात मोसंबीची लागवड केली आहे. मोबीन शेख उस्मान व रिजवान शेख मोबीन (कुसुंबा रोड मालेगाव) या दोघांनी शिंदी गावातील आतिष सुभाष फाटे यांच्या मध्यस्तीने माधव जाधव यांच्यासह गावातील १३ शेतकऱ्याचा मोसंबीचा ३३ लाख ८६ हजार रुपयांचा शेतमाल खरेदी करुन घेतला. त्यानंतर तो परस्पर विकून टाकला होता. परंतू शेतकऱ्यांचे पैसे न देताच फरार झाले होते. फसवणूक झाल्याप्रकरणी माधव जाधव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणानुसार गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरविली. संशयित आरोपी मोबीन शेख उस्मान यास सुरत येथून सतिष फाटे यांस शिंदी तर रिजवान शेख मोबीन याला मालेगाव येथून अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोना नितीन आमोदकर, पोकॉ निवृत्ती चित्ते, पोना नंदकुमार जगताप आदींनी केली.

Protected Content