Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘सोशल मीडिया’ आधारशी जोडण्याचा विचार सुरु आहे का ? : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला विचारणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) व्हॉट्सएप, फेसबुक असे सोशल मीडिया अकाऊंट आधारकार्डशी लिंक करण्याचा काही विचार सुरु आहे का? असा विचार होत असेल तर योजना सांगावी, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत.

 

या संदर्भ अधिक असे की, ‘सोशल मीडिया’ आधारशी जोडणार असल्याचे वृत्त समोर आले होते. या संदर्भात मद्रास उच्च न्यायालयात दोन याचिका आणि मुंबई तसेच मध्य प्रदेश न्यायालयातही प्रत्येकी एक याचिका दाखल झाली आहे. याचिकेत आधार कार्ड किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र हे सोशल मीडिया अकाऊंटसाठी अनिवार्य करायला हवे, असे म्हटले आहे. यावर सुनवाई दरम्यान, न्यायमुर्ती दिपक गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने केंद्राला यासंदर्भातील माहीती न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे. यानुसार सरकारतर्फे सोशल मीडिया अकाऊंट आधारशी जो़डण्याचा विचार होत असेल तर योजना सांगावी असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सोशल मीडिया आधारशी जोडण्यावर काही विचार सुरु आहे का ? असा प्रश्न देखील यावेळी विचारण्यात आला. यासंदर्भातील पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला होणार आहे.

Exit mobile version