Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ड्रायफ्रूट्सवर ताव मारत चोरट्यांनी लांबविला अडीच लाखांचा मुद्देमाल

जळगाव प्रतिनिधी । भुक्कड चोरट्यांनी घरातील काजू बदामांसह इतर खाद्यपदार्थांवर ताव मारत सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शहरातील योगेश्‍वर नगरात घडली आहे. . याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश्‍वर नगर येथे काजल विकास भोळे (वय ३५,) ह्या पती विकास चंद्रकांत भोळे व मुलांसह वास्तव्यास आहेत. काजल भोळे यांच्या पती विकास भोळे यांचा अपघात झालेला असल्यामुळे त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे. तसेच प्रेमचंदनगरात राहणारे त्यांचे वडील देखील आजारी आहेत. त्यामुळे काजल भोळे ह्या वडीलांची सुश्रुशा करण्यासाठी दररोज वडीलांच्या प्रेमचंदनगरातील घरी मुक्कामी असतात. नेहमीप्रमाणे १७ रोजी त्या योगेश्‍वर नगरातील घर बंद करुन दोन्ही मुलांसह वडीलांकडे मुक्कामी गेल्या. यादरम्यान चोरट्यांनी मध्यरात्री त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.  घरातून १ लाख ६८ हजार ६०० रुपयांचे दागिने व ७५ हजार ५०० रुपयांची रोकड असा २ लाख ४४ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला. १८ ऑगस्ट रोजी काजल भोळे यांचा मुलगा धवल हा घरी आल्यावर चोरीचा प्रकार उघड झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक यशोदा कणसे, परीस जाधव, किरण वानखेडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. श्‍वान पथक व ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होेते. याप्रकरणी काजल भोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक यशोदा कणसे ह्या 

करीत आहेत.

Exit mobile version