Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉस्पिटलमधून तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । नातेवाईकांना गोदावरी कोवीड सेंटरमध्ये भेटण्यासाठी आलेल्या तरूणाची ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनेश दिनकर नेमाडे (वय-२३, रा. चिनावल ता.रावेर) हे रेल्वेत नोकरीला आहे. २७ एप्रिल रोजी साकळी १० वाजता येथून जवळ असलेल्या शहरातील गोदावरी सेंटरला भेट देण्यासाठी  (एमएच १९ डीपी २६४५) क्रमांकाच्या दुचाकीने आले होते. २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी दुपारी आज्ञात चोरट्यांवर दिनेश नेमाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका मोहन चौधरी करीत आहे.

Exit mobile version