Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथून तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथून तरूणाची राहत्या घरासमोरून २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भुषण हिरालाल चौधरी (वय-२९) रा. ग्रामपंचायत समोर नशिराबाद या तरूणाने रेशन दुकान आहे. रेशन दुकान चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. ८ मे रोजी रात्री त्याच्या घरासमोर दुचाकी (एमएच १९ बीडब्ल्यू ५०८५ ) पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अंगणासमोर लावलेली २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे ९ रोजी उघडकीला आले. परिसरात दुचाकीचा शोध घेवून न मिळाल्याने पोलीसात धाव घेतली. भुषण चौधरी यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गुलाब माळी करीत आहे.

Exit mobile version