Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुरट्या चोरांची भुरटेगिरी! घरफोडी करून मोबाईल व गॅस शेगडी लांबविली

‍जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी नगरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळील बंद घराचे कुलूप व दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील फर्निचरचे नुकसान करण्यासह मोबाईल व गॅस शेगडी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजीनगर भागातील रहिवासी रोहम रामदास कोचुरे (४४) हे ३१ डिसेंबर रोजी बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत कुलूप व दरवाजाचे फालकेही तोडून आत प्रवेश केला. घरातील फर्निचरचे नुकसान करत ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल, १ हजार रुपये किमतीची गॅस शेगडी असा एकूण ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. चारीची ही घटना लक्षात आल्यानंतर मोबाईल व शेगडीचा शोध घेतला मात्र ते न सापडल्याने कोचुरे यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यावरून शुक्रवारी १२ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करत आहेत.

Exit mobile version