Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरटे सुसाट – घरासमोरून लांबविली दुचाकी

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तापी नगर परिसरात घरासमोरून एकाची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे.

याप्रकरणी गुरुवार, दि. २४ मार्च रोजी रात्री उशिरा भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “प्रमोद रामचंद्र निकम (वय-४८) रा. तापी नगर भुसावळ हे चालक असून त्यांच्याकडे त्यांची (एमएच १९ डीजी ५४२२) क्रमांकाची दुचाकी आहे. या दुचाकीचा वापर ते दैनंदिनी कामासाठी करतात. मंगळवारी २२ मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता त्यांनी दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क करुन लावली होती.

दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरुन नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीला आला. दोन दिवस त्यांनी परिसरात दुचाकीचा शोधाशोध केली. परंतु कुठेही दुचाकी आढळून आली नाही.

त्यामुळे गुरूवार २४ मार्च रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक जाकिर मन्सूरी हे करीत आहे.

Exit mobile version