Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी चोरीप्रकरणी चोरट्यास २ वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा; यावल न्यायालयाचा निकाल

यावल प्रतिनिधी । यावल पोलीसात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दोषी ठरवत चौहाणसिंग उर्फ चवन्या उर्फ सोन्या बिलारसिंग पावरा रा. जामुनझिरा ता. यावल याला आज गुरूवारी ७ ऑक्टोबर रोजी यावल न्यायालयाने दोन वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा ठोववली आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव येथील दिलीप वसंत पाटील यांची (एमएच १४ बीएस ६५८१) क्रमांची दुचाकीची खालकोट शिवारातून जुलै २०२१ मध्ये चोरीस गेली होती. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिष्ट नंबर ११२/२०२१ प्रमाणे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून चौहाणसिंग उर्फ चवन्या उर्फ सोन्या बिलारसिंग पावरा रा. जामुनझिरा ता. यावल  याला अटक करण्यात आली होती. यावल पोलिस स्टेशनचे हवालदार सुनील सोपान तायडे यांनी संशयित आरोपी विरोधात यावल न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. आरोपीविरुद्ध चार साक्षिदार सरकार पक्षातर्फे भक्कम बाजू मांडत चार सिक्षिदार तपासण्यात आले. यात संशयित आरोपीला दोषी ठरविण्यात आले. यावल न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपी अटक केल्यापासून त्यास जामीन मंजूर न झाल्यामुळे कारागृहातच होता. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नितीन खरे यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. या  कामी केस वॉच अलीम शेख यांनी त्यांना मदत केली आरोपीतर्फे एडवोकेट  सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

Exit mobile version