Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरीच्या १८ सायकलींसह चोरट्यास अटक; शहर पोलीसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वेगवेगळ्या भागातून सायकली चोरून कमी भावात विक्री करणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून १८ सायकली जप्त करण्यात आले आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो.ना. प्रफुल्ल धांडे, तेजस मराठे आणि राजकुमार चव्हाण हे सकाळी पेट्रोलिंग करत असतांना नेहरू पुतळा ते टॉवर चौक दरम्यान असलेल्या कॉटनकिंग दुकानासमोर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. गणेश दौलत साबळे (वय-४२) रा. खडका रोड, भुसावळ असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची एक सायकल काढून दिली. त्यानंतर ६ चोरीच्या सायकली काढून दिल्या. अधिक कसून चौकशी तर त्याने १८ चोरीच्या सायकली काढून दिल्यात. त्याच्या खिश्यातून चाव्यांचा गुच्छा आढळून आला आहे. त्यामुळे अजून काही चोरीच्या सायकली मिळण्याच्या असल्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे.  ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय निकुंभ, रतन गिते, योगेश इंधाटे, संजय झाल्टे  यांनी केली आहे. 

Exit mobile version