Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझा अपघात घडवून ठार मारण्याची शक्यता : सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माझ्या वाहनाचा अपघात घडवून ठार मारण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी झंझावातील सभांनी वातावरण ढवळून काढले आहे. अर्थात, सभांमधील त्यांनी काही तर काही जुन्या वक्तव्यांवरून त्यांच्यावर जोरदार टिकादेखील करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर चंद्रपुरातील एका सभेत बोलतांना त्यांनी धक्कादायक दावा केला आहे.

या सभेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, ”आगामी काळात माझ्यावर काही संकटं येऊ शकतात. काही लोक, अधिकारी मला सांगतात की, रात्रीचा प्रवास टाळा. घात-अपघात होऊ शकतो. आतापर्यंत अपघातात अनेकजण गेले आहेत. तुमच्यावर आरोप करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते तुम्हाला थेट गोळी घालण्याऐवजी तुमचा अपघात घडवून आणू शकतात. मात्र याला मी घाबरणार नाही. माझी प्रतिकात्मक तिरडी बांधू देत किंवा प्रत्यक्ष तिरडी बांधू देत, मी मात्र माझं काम प्रमाणिकपणे करण्याचे ठरवलेले आहे !” असे विधान सुषमा अंधारे यांनी केले आहे.

Exit mobile version