Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त म्हणजे १०६ टक्के पावसाची नोंद होईल. देशात ८७ सेंटीमीटर पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. भारतातील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. चांगल्या पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे हाल होतात. शिवाय, पिण्याचा- सांडपाण्याचा प्रश्न देखील सध्या गंभीर बनला आहे. अनेक धरणे कोरडीठाक पडली आहे. अनेक धरणांमध्ये काही दिवस पुरेल इतका पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अल निनोचा प्रभाव मान्सूनआधी कमी होणार आहे. कवकुवतला निनाची परिस्थिती निर्माण होईल. याचा फायदा चांगल्या मान्सूनसाठी होईल. आयएमडीने पत्रकार परिषद घेतली होती. यात सांगण्यात आलंय की, जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा असेल. ८ जूनपर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे. अल निनोची स्थिती सध्या साधारण आहे. पावसाळा सुरु झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपलेला असेल.

Exit mobile version