Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Theft : सिंधी कॉलनीत घरफोडी; पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंधी कॉलनीतील व्यापाऱ्याचे बंद घर फोडून अडीचा लाखाची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण ५ लाखांचे मुद्देमाल पोबारा केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील सिंधी कॉलनीतील साधना आश्रम जवळील कंवर नगरातील रोहीत ईद्रकुमार मंधवानी (वय-३०) हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचे बळीराम पेठेत होम अप्लायन्स नावाने किचन वेअरचे दुकान आहे. रोहीत याच्या आत्याच्या मुलाचे लग्न असल्याने ते कुटुंबियांसह २२ रोजी रात्री १० वाजता अमरावतीला येथे घर बंद करून गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते सोमवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरी परतले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्यांनी घरात जावून पाहणी केली असता हॉल, बेडरुम, किचन व स्टोर मधील सामान अस्ताव्यवस्त पडलेला दिसून आला. तर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले दिसून आले. तसेच कपाटात ठेवलेले सात तोळे सोन्याची दागिने व अडीच लाख रुपयांची रोकड त्यांना दिसून आली नाही. त्याचप्रमाणे सोन्याच व चांदीचे दागिने, मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवलेल्या व्हीएचए कंपनीच्या ४० मिक्सरच्या मोटारी देखील चोरीस गेली. याबाबत रोहित मंधवानी यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version