Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाटीकाश्रम जवळील पत्र्याचे शेड तोडून वेल्डींग सामानांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महामार्गावरील वाटीकाश्रम येथील वेल्डींगचे दुकान फोडून ७३ हजार रूपये किंमतीच्या सामानांची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, किशोर अशोक मिस्तरी (वय-२५) रा. कोल्हे नगर हिल्स जवळ, वाघ नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांचे जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाटीकाश्रमजवळ वेल्डींगचे दुकान आहे. वेल्डींगचे कामे करून आपला उदरनिर्वाह करत असतात. नेहमीप्रमाणे सोमवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता किशोर मिस्तरी हे दिवसभराचे काम आटोपून दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संधी साधत दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सुमारे ७३ हजार रूपये किंमतीच्या सामानांची चोरी केली. मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे समोर आले. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Exit mobile version