Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोलाणी मार्केटमधून दुचाकीची चोरी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील तरूणाची दुचाकी गोलाणी मार्केटमधून चोरी केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, सतिष गोविंदा बारी (वय-४५) रा. शिरसोली ता.जि.जळगाव हे कामाच्या निमित्ताने जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये दुचाकी (एमएच १९ बीव्ही ५८०७ ) ने रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आले. गोलाणी मार्केटजवळ त्यांनी दुचाकी पार्कींग करून लावली. काम आटोपून १० वाजता दुचाकीजवळ आले असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी सतिष बारी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे. 

Exit mobile version