Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आखतवाडे व बदरखे शेत शिवारातून १ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या दोन बैल जोडींची चोरी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी तालुक्यातील आखतवाडे व बदरखे शेत शिवारातून चोरट्यांनी दोन बैल जोड्या चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “तालुक्यातील आखतवाडे येथील शेतकरी सुनिल आधार गढरी यांचे शेत (गट क्रमांक २२२ / अ) आहे. या शेतातून सोमवार, दि. २५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून ते मंगळवार, दि. २६ जुलै रोजी पहाटे ६:१५ वाजेच्या दरम्यान ५५ हजार रुपये किंमतीची बैल जोडीची  चोरी करण्यात आले आहे.

यासह बदरखे येथील शेतकरी धृवबाळ शिवाजी यांच्या (शेत गट क्रमांक १९७) शेतातून ५० हजार रुपये किंमतीची बैल जोडीही चोरट्यांनी चोरून नेली आहे. अशा एकूण १ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या दोन बैल जोड्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र शिंदे हे करीत आहे.

Exit mobile version