Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोहाडी गावातून दोन गुरांची चोरी

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मोहाडी गावातून शेतकऱ्याच्या मालकीच्या दोन गुरांची चोरी केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात शरद पुंडलिक वंजारी (वय-४२) रा. मेहरूण परिसर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गावातील शेताजवळ बैल आणि गोऱ्हा बांधलेला होता. अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीचा बैल आणि १० हजार रूपये किंमतीचा गोऱ्हा चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शरद वंजारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक समाधान टहाकळे करीत आहे.

Exit mobile version