Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषी तंत्र विद्यालयातून इन्व्हर्टरसह दोन बॅटऱ्यांची चोरी

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या ग्रंथालयातून अज्ञात चोरट्यांनी इन्व्हर्टरसह दोन बॅटऱ्या लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत अडावद पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अडावद पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शहरातील कृषी तंत्री विद्यालयात असलेल्या ग्रंथालयातून अज्ञात चोरट्यांनी ४ जून ते ५ जून दरम्यान मध्यरात्री १० हजार रूपये किंमतीचे इन्व्हर्टर आणि २० हजार रूपये किंमतीच्या जम्बो बॅटऱ्या असा एकुण ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य अनिल केशव माळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास बाविस्कर करीत आहे.

 

Exit mobile version