Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव शहरातून ट्रॅक्टरसह ट्रॉलीची चोरी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील पोतदार शाळेजवळील परिसरातून शेतकऱ्याचे ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरून नेल्याची घटना बुधवार २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री १०.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजीत सुभाषराव शितोळे वय-४३ रा. पोतदार शाळेजवळ, चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शेतीचा लागणारा त्यांचा ट्रॅक्टर (एमएच १९ सीवाय २०९९) आणि ट्रॉली घराच्या परिसारात पार्कींगला लावेली होती. अज्ञात चोरट्यांनी २६ मार्च रोजी रात्री १० ते २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची चोरी केल्याचे समोर आले. ट्रॅक्टर व ट्रॉलीची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रात्री १०.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विश्वास पाटील हे करीत आहे.

Exit mobile version