Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनगरवाड्यातून तीन बकऱ्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातील धनगरवाडा येथून १२ हजार रूपये किंमतीच्या तीन बकऱ्यांची चोरी केल्याची घटना उघडकीला आले आहे. गुन्ह्यात एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर रमेश बारेला वय-२१, रा. पिंपडीया जि.खरगोन ह.मु. एरंडोल असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातील धनगरवाडा येथे राहणाऱ्या रिझवान जब्बार खाटीक (वय-२४) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चिकन शॉप चालवून ते आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांच्या मालकीच्या ३ बकऱ्या त्यांच्या घरासमोर बांधून ठेवल्या होत्या. दरम्यान संशयित आरोपी शंकर रमेश बारेला याने १२ हजार रूपये किंमतीच्या ३ बकऱ्या चोरून नेल्या. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. दरम्यान याप्रकरणी रिजन खाटीक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी शंकर रमेश बारेला याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.

Exit mobile version