Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय वाहनांच्या स्पेअर्स पार्टची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव पोलीस मुख्यालयातील जुनी सीटी लाईन सेक्टरमधील चार खोल्यांमधून शासकीय मालकीच्या जुन्या वाहनांचे स्पेअर्स पार्ट असा एकुण ६९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ६ जुलै रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव पोलीस मुख्यालयातील जुनी सीटी लाईन सेक्टरमधील खोल्यांमध्ये मोटार परिवहन विभागातील नादुरूस्त वाहनांचे स्पेअर्स पार्ट ठेवण्यात आले होते. १ जुन ते ६ जुलै दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या खोल्यांमध्ये ठेवलेले ६९ हजार रूपये किंमतीचे स्पेअर्स पार्ट चोरून नेल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात मोटार वाहन विभागाचे सहाय्यक फौजदार सुरेंद्र महाजन यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार ६ जुलै रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहे.

Exit mobile version