Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेत शिवारातून पाईपांची चोरी; यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी पाईंपाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, चंद्रकांत पंडीत चौधरी (वय-५८) रा. देशमुख वाडा, यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीचे पाण्याचे पाईप यावल शिवारातील रमेश अतुल देशमुख यांच्या शेतात ठेवलेले होता. दरम्यान रविवार १० एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी शेतातील पाईप चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात शोधाशोध केली असता त्यांना पाईप कुठेही आढळून आले नाही. अखेर त्यांनी मंगळवारी १२ एप्रिल रोजी रात्री १० वाजता यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.

 

Exit mobile version