Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतातून ईलेक्ट्रीक मोटारीसह पाईपची चोरी

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारातील शेतातून १५ हजार रूपये किंमतीची ईलेक्ट्रीक मोटारीसह पाईप चोरून नेल्याची घटना शुक्रवार ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता उघउकीला आले आहे. याप्रकरणी शनिवार ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश पुनमचंद जैन वय ५७ रा. चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारातील शेतात शेत आहे. गुरूवार ७ मार्च रोजी सायंकाळी ५ ते शुक्रवार ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातून ईलेक्ट्रीक मोटार आणि पाईच असा १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी प्रकाश जैन यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. अखेर त्यांनी शनिवारी ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धााव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण सपकाळे हे करीत आहे.

Exit mobile version