Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंचोली शिवारातून बैलजोडीची चोरी; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली  शिवारातून एका शेतकऱ्याची ३० हजार रूपये किंमतीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, समाधान संतोष जगताप (वय-५५) रा. उमाळा ता.जि.जळगाव हे शेतकरी आहे. त्यांचे चिंचोली शिवारातील गावाजवळील बसस्थानकाजवळ त्यांचे शेत आहे शेती करून आपल्या कुटुंबिंयांचा उदरनिर्वाह करतात. ९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या मालकीचे दोन बैल त्यांनी त्यांच्या शेतात बांधले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी चोरून नेल्याचे प्रकार १० जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला. परिसरात बैलांचा शोध घेतला परंतू बैलजोडी कुठेच आढळून आली नाही. समाधान जगताप यांनी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी करीत आहे.

 

Exit mobile version